यशोगाथा वायरल झालं जी

लहान मुलांसाठी फुगे बनविणारी MRF कंपनी आता सुखोई सारख्या लढाऊ विमानाचे टायर बनवित आहे

तुम्हाला हे माहीत आहे का? MRF हा टायरचा भारतीय बनावटीचा ब्रॅंड आहे.सर्वात आधी आपण MRF पूर्ण अर्थ काय होतो हे जाणून घेऊ या.मद्रास रबर फॅक्टरी असा MRFचा अर्थ होतो.ही कंपनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन करण्यात आली होती.

1946 साली MRF सुरवात झाली.आधी ही कंपनी लहान मुलांसाठी फुगे बनवीत असे.केएम मैमन मापिल्लई यांनी या कंपनीची स्थापना केली.सध्या शेयर मार्केटमध्ये MRF ची फार चर्चा आहे. कारण या कंपनीचे शेअर्स सर्वाधिक महाग विकले जात आहेत.जवळपास एक लाख रुपया पर्यत त्यांची किंमत गेली होती.

एम मैमन मापिल्लई यांचे वडील देखील उत्तम व्यवसायिक होते पण 1946 मध्ये त्रावणकोरचा राजा जेव्हा स्वातंत्र्याच्या लढाईत सामील होणार होता,तेव्हा त्याने सर्वांची संपत्ती जमा करून घेतली होती.तेव्हा मैमन यांची देखील संपत्ती जप्त केली होती.तरी देखील मैमन यांनी मोठ्या जिद्दीने पुन्हा नवीन व्यवसाय सुरू केला होता.

त्यांनी फुगे बनविण्याची फॅक्टरी सुरू केली होती.सुरुवातीच्या काळात केएम स्वता प्रत्येक दुकानात जाऊन त्यांचा माल पोहच करायचे.1954 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून चार वर्ष झाली होती.त्या नंतर त्यांनी ट्रेड रबर उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आणि त्या नंतर त्यांनी मागे वळून पाहिलचे नाही.

1962 पासून त्यांनी टायर बनविण्यास सुरुवात केली.1964 मध्ये एमआरएफ टायर अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली.1973 मध्ये पहिला रेडियल टायर बनविला.2007 साली एमआरएफचा व्यवसाय सर्वाधिक वाढला.

आज एमआरएफ ट्यूब ,टायर या बबरोबरच लढावू विमानाचे टायर देखील बनविते.जगातील 65 देशांना एमआरएम टायर पुरविते. 1993 साली एमआरएम शेअर मार्केटमध्ये उतरले तेव्हा त्यांच्या शेअयर्सची किंमत केवळ 11 रुपये होती.आज ती 1 लाखा पर्यत पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *