लाइफफंडा

‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या!

आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बर्‍याच स्त्रिया बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. तसेच वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल वगैरे करतात. परंतु काही लोकांची त्वचा इतकी संवेदनशील असते की बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्याने मुरुम, सूज यासारख्या समस्या चेहऱ्यावर दिसू लागतात. अशा परिस्थितीत पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा लोकांसाठी, होम फेशिअल पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. या फेशिअलमुळे त्वचेला कोणतीही हानी होत आणि त्वचा देखील चमकदार होते. 

होम फेशिअलची पद्धत :

क्लीन्जिंग : चेहऱ्यावरील धूळ, माती आणि घाण स्वच्छ करण्यासाठी प्रथम क्लीन्जिंग केले जाते. यासाठी आपण हायड्रेटिंग क्लीन्सरची निवड करा. हार्ड क्लीन्सरचा उपयोग अजिबात करू नका.

स्क्रबिंग : फेशिअलची दुसरी पायरी स्क्रबिंग आहे. यामध्ये चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकली जाते. याला एक्सफोलिएशन असेही म्हणतात. मध, साखर आणि थोडे मीठ एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि तीन ते चार मिनिटे चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टोनिंग : गुलाबाच्या पाण्याने देखील टोनिंग केले जाते. परंतु, चांगल्या टोनिंगसाठी तांदळाच्या पाण्याचा बर्फ तयार करून त्याचा वापर करा. स्क्रब केल्यावर ते चेहऱ्यावर चांगला मसाज करा. यामुळे मोकळे पोर्स बंद होतात

मसाज : फेशिअलची चौथा पायरी म्हणजे फेस मसाज, ज्याची या प्रक्रियेत सर्वात मोठी भूमिका आहे. यासाठी नैसर्गिक कोरफड जेल वापरा. सुमारे 10 ते 15 मिनिटे या जेलने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

फेस पॅक : फेसपॅक चेहऱ्याला सर्वात शेवटी लावला जातो. त्यासाठी मसूर डाळ रात्री भिजवा. सकाळी त्यात थोडे दूध मिसळून जाडसर पेस्ट बनवा. दोन थेंब लिंबूसर घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. याशिवाय आपण बेसन पिठामध्ये चिमूटभर हळद, मध आणि मलई घालून देखील फेस पॅक बनवू शकता. जर चेहरा तेलकट असेल तर मलईऐवजी दुधाचा वापर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *