महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 116 वर

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

मुंबईत एकूण कोरोना रूग्ण 45 कोरोनाबाधित सापडले आहेत. मुंबईत रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

सांगतील एका कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 116 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याची माहिती आहे.