महाराष्ट्र

आता मुंबईकरांना लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा

मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. आता त्यांचा रेल्वेमधील प्रवास मजेशीर होणार आहे. कारण आता लोकलमध्ये वायफायची सुविधा प्रवाशांना मोफत मिळणार आहे.

रेल्वेने ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे वायफाय प्रायोगित तत्वांवर मध्य रेल्वेत बसवण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पश्चिम, मध्य, हार्बर या तीन्ही मार्गावरील रल्वेमध्ये वायफाय बसवला जाणार आहे.

मध्य रेल्वेने सध्या १६५ लोकलमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सुविधेसाठी जे अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे, त्यात काही चित्रपट, मालिका आणि गाणी प्रीलोडेड असणार आहेत. ही सामग्री प्रवाशांना मोबाईलवर लॉगइन केल्यानंतर मोफत पाहता येणार आहे.