महाराष्ट्र

आनंदाची बातमी; महाराष्ट्रातील 19 रुग्ण कोरोनामुक्त

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण अशातच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आतापर्यंत ४,२२८ जणांची Covid-19 ची चाचणी करण्यात आली. त्यात ४,०१७ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तर १३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे राजेश टोपे यांनी सांगितले. जे १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ते उपचारानंतर पूर्णपणे  बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.