बातमी महाराष्ट्र

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज बंद; जाणून घ्या का?

पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्यावर जाहिरात फलक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ही वाहतूक कूसगाव टोलनाक्यावरून वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.