देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ब्रिटनला मोठा धक्का बसला आहे.

बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार आहे”.

 

याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती.