देश

रस्त्यावरील प्लास्टिक द्या आणि मोफत जेवण करा

जर तुम्हाला कोणी सांगितले की, रस्त्यावरचे प्लास्टिक गोळा करुन द्या आणि पोटभर जेवण मोफत मिळवा यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं होणार आहे.  देशात असाच एक गार्बेज कॅफे सुरु होणार आहे. या कॅफेचे उद्घाटन आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव आज करणार आहेत.

प्लास्टिकपासून वातावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. ही हानी रोखण्यासाठी छत्तीसगडस्थित अंबिकापूरमधील प्रशासनाने एक आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना मोफत जेवण देण्यासाठी गार्बेज कॅफेची सुरुवात करण्यात आली आहे. हे गार्बेज कॅफे २४ तास खुले राहणार आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

१ किलो प्लास्टिक आणल्यास, एकवेळचं भरपेट जेवण मिळणार आहे. तर ५०० ग्रॅम प्लास्टिक आणल्यास ब्रेकफास्ट मोफत मिळणार आहे.