देश

कोरोना विरुध्दचे युध्द 21 दिवसांमध्ये जिंकायचे आहेः पंतप्रधान मोदी

“महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान  मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आज (बुधवारी) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी, सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला करोनाविरोधातील ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये काशीवासियांची देखील मोठी भूमिका असेल.”