देश

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

देशातील गोरगरीबांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली आहे. गोरगरिब आणि कामगारांसाठी 1 लाख 70 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे.

देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं

निर्मला सितारामन यांनी केल्या या मोठ्या घोषणा

8.69 शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये. प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत एप्रिल आधीच जमा होणार हफ्ता

मनरेगा मजूरांचा पगार वाढणार. 5 कोटी मजूरांना होणार याचा फायदा

3 कोटी वरिष्ठ नागरिक, विधवा स्त्रिया आणि दिव्यांगांना 1000 रुपये प्रति महिना अशी मदत 3 महिन्यांसाठी मिळणार

उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 महिन्यांसाठी सिलेंडर फ्री मिळणार

पुढील तीन महिन्यांसाठी EPF सरकार भरेल.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ईपीएफ योगदानाची भरपाई केली जाईल. पीएफ योगदान कंपनीच्या 12 टक्के आणि कर्मचारी 12 टक्के म्हणजे 24 टक्के सरकार पैसे देईल.