बातमी

कोरेगाव भीमा प्रकरणः एनआयएची टीम पुण्यात दाखल

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम पुण्यात दाखल झाली आहे. पुणे पोलिसांकडून काही कागदपत्र घेऊन ही टीम पुन्हा परतली.

एनआयएचे तीन अधिकारी मुंबईहून पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी आज दिवसभर या प्रकरणातील कागदत्रपत्रांची पाहणी केली. एनआयएच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीच्या स्थापनेची मागणी करण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्रही लिहिलं होतं. मात्र, यानंतर तात्काळ केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद असल्याची शंका स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केली. केंद्राकडे प्रकरण दिल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच एनआयएचं पथक पुण्यात दाखल झालं आहे.