बातमी

देशातील सगळ्यात मोठे कोरोना हॉस्पिटल ‘या’ राज्यात उभारणार

देशातील सगळ्यात मोठे कोरोना हॉस्पिटल ओदिशा सरकार उभारणार आहे. या हॉस्पिटल मध्ये तब्बल 1 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.