बातमी

शिर्डी साईबाबा संस्थानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 कोटींची मदत

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिर्डी साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 कोटींची मदत देण्याचा निर्णय साईबाबा संस्‍थानच्‍या समितीने घेतला असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिर समितीने कोरोनाच्या भयान संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी सरकारचे हात बळकट करण्यासाठी 51 कोटी रूपयांची भरघोस मदत केली आहे.  देवस्थान प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत हा निधी शासनाला देण्याचं ठरवलं आहे.

संस्‍थानचे साईप्रसादालयाच्‍या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना, शिर्डी बस स्‍थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्‍थानच्‍या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्‍वच्‍छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्‍क भोजन पुरवण्‍यात येत आहे.