विदर्भ

भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवरः नीता अंबानी

क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे. त्यामुळे भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी काढले आहे.

लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत नीता अंबानी यांनी भाषण केले. इन्स्पायरिंग अ बिलियन ड्रीम्स : द इंडिया अपॉर्च्युनिटी या विषयावर बोलताना त्यांनी भारताने क्रीडाक्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. मुंबई इंडियन्स या टीमच्या माध्यमातून क्रिकेटसाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी आढावा घेतला. त्यांच्या भाषणाला या परिषदेत चांगला प्रतिसाद मिळाला.