देश ब्लॉग महिला विशेष यशोगाथा

कचऱ्यापासून वीज तयार करणारी पहिली मराठमोळी महिला….

आजच्या धकाधकीच्या जीवनात कचऱ्याचा विचार कोण करतं? घरातला कचरा कचरापेटीत टाकला की आपल काम संपलं असच सगळे जण समजतात. पण कुणी कधी विचार केलाय की या कचऱ्याच पुढे काय होतं? त्याच व्यवस्थापन कस केल जात?

या सगळ्याचा विचार केला निर्मला कांदळगावकर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी लोक जेव्हा रिटार्ड होण्यासाठी तयारी करत असतात तेव्हा निर्मला यांनी नवा व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कचऱ्याच योग्य निर्मूलन करून त्यातून काहीतरी चांगल तयार झाल पाहिजे हा त्या मागचा हेतू होता.

ग्रामीण भागातील महिलांना काम देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या व्यवसायासाठी सुरुवातीला लोकांनी निर्मला यांना वेड्यातच काढलं, की कचऱ्यापासून थोडीच काही बनवता येत का? पण याच सडेतोड उत्तर त्यांनी आपल्या कामातून लोकांना दिलं.
आज विवाम अ‍ॅग्रोटेकच्या चेअरपर्सन निर्मला कांदळगावकर या घनकचरा व्यवस्थापन करण्याचे उत्कृष्ठ कार्य करतात.
त्याच्या कंपनीने पुरविलेल्या सेवांद्वारे गावे स्वच्छ करण्याकडे व कचर्‍याचा इष्टतम वापर करण्याच्या दिशेने पाऊल उचलली जात आहेत.

आज त्यांची विवाम अ‍ॅग्रोटेकच्या ही क़पनी गांडूळ खत, बायोगॅस, यांत्रिकी व जिवाणू कंपोस्टिंग आणि बायोडिग्रेडेबल कचर्‍यापासून वीजनिर्मिती संबंधी तांत्रिक उपाय व कन्सल्टिंग व तांत्रिक सेवा प्रदान करते.
निर्मला कांदळगावकर (वय 64.) यांनी विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केली आणि पर्यावरण विज्ञान विषयात पदव्युत्तर पदविका घेतली. २००१ पासून घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्या आपल्या कंपनीच्या अध्यक्ष आहेत.
त्यांना अशी एखादी गोष्ट सुरु करायची होती ज्यात जास्त गुंतवणूकीची गरज भासणार नाही. पती कडून पन्नास हजार उसने घेऊन सुरू केलेला हा व्यवसाय आज 5 कोटी रुपयांची उलाढाल करतो. पती गिरीश, हे यांत्रिक अभियंता, त्यांच्या तांत्रिक मदतीने कांदळगावकर यांनी कंपोस्टिंग युनिटवर काम करण्यास सुरवात केली. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर औरंगाबादमध्ये झाली. त्यांची एक मुलगी व दोन मुले मोठी होऊन त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कुटूंबाच्या मदतीने आणि सहकार्याने आज त्या यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.
या कार्यात सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकांमध्ये जागरूकता नसणे हे आहे. कचर्‍याचे पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्याचे मूल्य लोकांना समजले पाहिजे. कचर्‍याला उपयुक्त असलेल्या रूपात रूपांतरित करण्यासाठी खूप कमी प्रयत्न करावे लागतात. लोकांनी हे बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वत: हून ही जबाबादारी घेण आवश्यक आहे. असे निर्मला म्हणतात.
वर्तमानात त्याच्या कंपनीद्वारे आठ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
आज त्यांची मुलगी नेहा ही आपली बँकेतील नोकरी सोडून निर्मला यांच्या बरोबर कंपनीचे काम पहाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *