बातमी मराठवाडा महाराष्ट्र मुंबई राजकारण वायरल झालं जी विदर्भ

स्वीय सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी नितीन गडकरींनी खर्च केले तब्बल 35 लाख !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नितीन गडकरी यांनी स्वीय्य सहाय्यकाला एअर अॅम्ब्यलन्सनं चेन्नईला नेण्यासाठी रात्रीच्या वेळी बँकेच्या सीईओला फोन करून लॉकर उघडून 35 लाख रुपये काढले. खुद्द नितीन गडकरी यांनीच व्हिडीओद्वारे ही माहिती दिली आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी ?

नितीन गडकरींनी सांगितलं की, नागपूरचं काम पाहणारे माझे स्वीय सहाय्यक मंडलेकर यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना विवेका रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु तिथल्या डॉक्टरांनी हात टेकले. चेन्नईमधील एमजीएम रुग्णालय जिथे हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोप होतं तिथं नेलं तर काही होईल असं त्यांनी सांगितलं.

पुढं बोलताना गडकरी म्हणाले, आमच्याकडे 24 तासांचा वेळ होता. मी एमजीएम रुग्णालयाशी चर्चा केली. अॅम्ब्युलन्सला 35 लाख रुपये अॅडव्हान्स पाहिजे असं त्यांनी सांगितलं. सायंकाळी 6 वाजल्यानंतर सगळ्या बँका बंद झाल्या. माझी बायको एका को ऑपरेटीव्ह बँकेची अध्यक्षा आहे. मी लगेच बँकेच्या सीईओंना फोन केला, बोलवलं आणि रात्री लॉकर उघडता येईल का असं विचारलं. मी 35 लाख रुपये घेतले आणि अॅम्ब्युलन्सवाल्याला दिले.

नितीन गडकरी म्हणाले, ते मशीन घेऊन आले. त्यांच्यासोबत 5 डॉक्टरही होते. त्यांना एअरलिफ्ट करून चेन्नईला नेलं. तिथं उपचार झाले आणि तो बरा झाला अशी माहिती गडकरींनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *