बातमी महाराष्ट्र राजकारण

कोरोना काळात देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम कोणत्याच नेत्याने केले नाही – चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या संपूर्ण काळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यांतील इतर कोणत्याच नेत्याने केले नाही.आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत.आमच्या दोघांइतंक कोणताच नेता फिरला नाही. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

लसीकरण ,ग्लोबल टेंडर ,मराठा आरक्षण इतर अनेक विषयांवर चंद्रकांत पाटील बोलत होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भरभरून टीका केली. केंद्र सरकार परवागी देत नसल्यामुळे महाराष्ट्राची लस खरेदी रखडलेली आहे.असे अजित पवार म्हणतात.मुळातच परवानगी नसताना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर हा शब्द पवारांनी कसा वापरला.

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता भेट घेतली ते उत्तमच आहे. पण उद्धव ठाकरे यांनी याधीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवे होते. असा देखील टोला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना लावला.त्यांनी भाजपावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *