यशोगाथा

भारतातल्या सर्व डीमार्ट, रिलायन्स सोबतच इतर २८ देशांत फक्त ‘याचा’ गूळ जातो.. जाणून घ्या मराठमोळ्या पठ्ठ्या कसा झाला करोडपती

संयम, चिकाटी, हुशारी आणि व्यवसायात झोकून द्यायची वृत्ती अंगी असली कि आपण अगदी शून्यातून उभा केलेल्या व्यवसायाला सातासमुद्रापार नेऊ शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जवळे येथील युवा खालकर बंधूं. या बंधूनी रेसिड्यू फ्री गुळाची निर्मिती केली आणि त्याला टप्प्याटप्प्याने तब्बल २८ देशांमध्ये विक्रीसाठी पाठवून २८ देशांची बाजापेठ काबीज केली आहे. विविध देशांची मागणी लक्षात घेऊन विविध पॅकिंगमधून गूळ सादर केला. त्यांचा हा व्यवसाय समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्श असं उदाहरण असंच आहे.

अगदी साधारण घरातून आलेला अनिकेत ने वयाच्या १६ व्या वर्षी या व्यवसायात पाऊल ठेवले आज त्याच वय २६ वर्ष , १० वर्षांत त्याने कोटयावधी रुपयांची उलाढाल केली आहे. पुणे जिल्ह्यात जवळे (ता. आंबेगाव) येथे अनिकेत आणि अमित हे खालकर राहतात. अनिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याच क्षेत्रात ‘करिअर’ न करता शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा व शेतीचा एकूण कल अभ्यासून गूळनिर्मिती व्यवसायात ते उतरले. आज सहा वर्षांचा संघर्ष, अपयश या सर्व अनुभवातून स्वतःला सिद्ध करीत त्यांनी जागतिक बाजारपेठेत आपल्या व्यवसायाला उतरवले आहे.

ह्या व्यवसायात पडल्यावर खालकरांनी केवळ देशांतर्गत नव्हे तर विविध देशांच्या बाजारपेठांचा नेमका अभ्यास केला, तेथील बाजारपेठ समजून घेतली,त्यानुसार उत्पादन व पॅकिंग पासून ते निर्यातीपर्यंतची प्रक्रिया समजून घेतली. तेथील व्यापाऱ्यांची कार्यपद्धती समजून घेतली, त्यांच्यासोबत नेटवर्क तयार केले, काही व्यापारानि यांचा गु विकत घेत नसल्याने खालकरांनी गुळाचा स्वतःचा ‘गौरी’ नावाचा ब्रँड तयार केला. अधिकृत प्रयोगशाळेतून उत्पादनासंबंधी आरोग्य प्रमाणपत्र तसेच निर्यातीसाठीची सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मिळवले. आणि अशा पद्धतीने विक्रीचा विस्तार वाढत जाऊन सुमारे २८ देशांत विक्री होऊ लागली.

एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता खालकर यांनी आपल्या कंपनीचे विस्तारीकरण केले आहे. आयरीश असे कंपनीचे नाव असून व डेलाज या ब्रॅंडने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती मागील महिन्यापासून सुरू केली आहे, त्याचबरोबर गौरी ऑटोमोबाईल्स या नावाने वाहनांचे शोरूमही मागील वर्षापासून सुरू केले आहे. हे यश संपादन करण्यासाठी खालकरांना खूप खडतर प्रवास करावा लागला. गूळ उत्पादन विक्रीत सुरवातीला खरेदीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी संघर्ष करावा लागला.बँकेने कर्ज देण्यासाठीची टाळाटाळ केली तसेच व्यापाऱ्यांनी अडवणूक केली. सुरुवातीच्या कालावधीत ना नफा, ना तोटा पद्धतीने काम करावं लागले ,निर्यात करताना परदेशातील काही व्यापाऱ्यांनी पेमेंट अडकवले ते वसूल करणे, अशाप्रकारे त्यांनी संघर्ष करत इथपर्यंत पोहचले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *