कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

शेकडो जीव वाचवण्यासाठी धावली ऑक्सिजन एक्सप्रेस,मोदींची बांगलादेशला मदत

मागील दीड वर्षापासून भारतासह संपूर्ण जगभर थैमान घातले आहे,त्यामुळे अनेक देशातील आरोग्य यंत्रणा कोलमाडून गेल्या आहेत.त्यामुळे शेजारील देश म्हणून अनेक देश एकमेकांना मदत करत आहेत.कोरोनामुळे अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.भारताने देखील शेजारील देश बांगला देशला ऑक्सिजन पाठविला आहे.आज पहिल्यांदा ऑक्सिजन एक्सप्रेस बांग्लादेशला रवाना झाली.एक शेजारील राष्ट्र म्हणून भारत नेहमीच बांग्लादेशला मदत करत आहे.

आज पहिल्यांदा भारताने ऑक्सिजन एक्सप्रेस बांगला देशला पाठविली आहे.आज सकाळी भारताने तब्बल 200 मॅट्रिक टन ऑक्सिजन पाठविला आहे. याविषयीची माहिती भारताचे नवे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी संबंधित ट्वीटमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

ज्यामध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेस काही ऑक्सिजन टँक घेऊन जाताना दिसत आहेत. या ट्विटमध्ये वैष्णव म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खाली माणुसकीच्या नात्यातून शेजारील राष्ट्राला कोरोना लढ्यात मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *