कोरोना इम्पॅक्ट देश बातमी महाराष्ट्र

शंभरी गाठलेल्या पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत फक्त २५ रुपये ?

ज्या पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे सगळ्यांची झोप उडवली आहे त्याची वास्तविक किंमत फक्त २५ रुपये इतकीच आहे. आणि आपल्याला ते विकत घ्यावं लागतंय जवळ जवळ १०० रुपयांना. हो वाढत्या महागाईमुळे सर्व-सामान्यांचे आयुष्य हे मोठ्या जिकरीचे बनले आहे. शंभरी गाठलेल्या पेट्रोल/डिझेल ची वास्तविक मूळ किंमत खूप कमी असते. पेट्रोलचा मूळ दर हा फक्त २८.५० रुपये इतका आहे. तर डिझेल चा मूळ दर २९.५२ इतका आहे. तर मग तुम्हाला प्रश्न पडला असणार कि, एक लिटर पेट्रोल साठी आपल्याला १०० रुपये का द्यावे लागत आहेत. तर त्याचे कारण हे आहे कि, त्यावर लादले जाणारे विविध कर.

पेट्रोल, डिझेल सारखे इंधन भारत सरकार इतर देशातून आयात करतं. पेट्रोल डिझेल ची आधारभूत किंमत २५ ते २७ रुपये च्या दरम्यान असते. आणि त्यावर भारतासाठी ६९ टक्के कर आकारला जातो. इंडियन ऑइल ने दिलेल्या माहितीप्रमाणे पेट्रोल प्रतिलिटर २९.८१ रुपये आहे तर त्यावर ०.३७ पैसे हे भाडे आकारले जात आहे. तर उत्पादन शुल्क ३२.९० रुपये घेतले जाते. तर डीलर कमिशन सरासरी ३.६७ रुपये व्हॅट आणि राज्याचे इतर कर २६.२६ रुपये आकारण्यात येतो. तर या सर्व खर्चाची एकूण किंमत ९२.५० रु. इतकी होते.

म्हणजेच पेट्रोल-डिझेल वर लागणाऱ्या करातून आणि त्यावर लागू करण्यात आलेल्या उत्पादन शुल्कातून भारत सरकार कमालीची कमाई करते. या कमाईचा त्याग करून सरकार वाढत्या किंमतीला आळा देऊ शकते हा उपाय वरवर सोपा वाटलं तरी तो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे येणाऱ्या मिळकतीतून पार पाडली जाणारी विकास कामे मात्र रखडली जाऊ शकतात. परंतु हे देखील खेदजनक बाब आहे. कि, संपूर्ण जगात पेट्रोल डिझेलवर सर्वाधिक कर लादणारा भारत देश हा पहिल्या रांगेत येतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *