७,००० मैलांचा प्रवास करणारी तसेच खंड आणि संस्कृतींचा प्रवास करण्यास भाग पाडणारी ही उल्लेखनीय सत्य प्रेमकथा आहे.
नवी दिल्लीतील सार्वजनिक चौकात या कथेची सुरुवात होते. एका थंडीच्या संध्याकाळी उच्य वंशाची एक युरोपीयन महिला पी.के. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भारतीय कलाकारांकडे आली आणि त्याला तिचे पोर्ट्रेट रंगवायला सांगितले – आणि यातून च पुढे त्या दोघांची आयुष्य कशी अचानक एक सुंदर वळण घेतात हे अतिशय परिकथे सारखं वाटते.
पीके यांचा जन्म पूर्व भारतातील ओरिसा मधील अथमलिक गावात 1949 ला झाला. जंगलाच्या काठावर असलेल्या एका छोट्या दुर्गम गावात ते वाढले आणि अस्पृश्य म्हणून त्यांचे बालपण खूप त्रास दायक होते. शाळेत असताना त्यांना वर्गाबाहेर बसायला लावायचे. एवढेच नव्हे तर वर्गातील मुले जेव्हा त्यांच्याशी संपर्कात येत तेव्हा ती मुले स्वत: ला धुवायची आणि जेव्हा ते गावच्या मंदिरात जात तेव्हा त्यांच्या वर दगडफेक केली जात.
प्रेम आणि धैर्याने पीके यांना अत्यंत दारिद्र्य, जातीभेद आणि प्रतिकूलते चा सामना करावा लागला. रस्त्यावर उभे राहून लोकांची चित्र काढणारा हा कलाकार जेव्हा इंदिरा गांधींचे चित्र काढून त्यांना पाठवतो व ते पाहून त्या कलाकाराला आनंदाने कॅनॉट प्लेस येते थांबून चित्र काढण्याची परवानगी त्या देतात. याच ठिकाणी एके दिवशी विदेशातून भारत फिरायला आलेली तरुणी पी के यांना भेटते व त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. त्यांचा ज्योतिषावर खुप विश्वास असल्याने त्यांना ज्योतिषाने सांगितले असते कि, तुझ्या पत्रिकेत असे लिहिले आहे की तुझी होणारी पत्नी हि खूप लांब राहणारी असेल व तिची रस वृषभ असेल. ती एका जंगलाची मालकीण असेल. हे चमत्कारिक विधान ऐकून त्यांच्या घरच्यांना ही आश्चर्य वाटते.
चार्लोट व्हान सॅन्ड्विन ही तरुणी स्वीडनची राहणारी ती भारतात तिच्या ग्रुप बरोबर ट्रिप ला आलेली असते. तेव्हा दिल्ली मध्ये कॅनॉट प्लेस या भागात आल्यावर तिथे बसलेल्या एका चित्रकार कडून तिच्या मित्र मैत्रिणी स्वतःचे चित्र काढून घेत होते. तसे तिने आपले चित्र काढायला त्या चित्रकारास सांगितले.
तेव्हा पिके हे चार्लोट चे चित्र काढताना त्यांना बोलता बोलता त्यांच्यात ओळख वाढत जाऊन त्यांची मैत्री होते. या दोघांनाही सचरूवाती पासून एकमेकांबद्दल आकर्षण जाणवते. पुढे भारत फिरायला आलेल्या चार्लोट ला पिके त्यांच्या ओडिसा राज्यातील गावात घेऊन जातात. तसेच तिला कोणार्क ही दाखवतात. या सगळ्याने प्रभावित होऊन ती सुध्दा पीके यांच्या प्रेमात पडते. तसेच या काळात पीके यांना समजते की, चार्लोट हिची रास ही वृषभ असून ती एका राजघराण्यात जन्माला आली असते व तिच्या मालकित एक जंगल वजा जमिन असते. हा अद्भूत योगायोग आहे का दैवी चमत्कार हे त्यांना कळत नाही. पण आपल्या पत्रिकेत सांगितल्या प्रमाणे चार्लोट ही मुलगी आहे. हे पाहून पीके आधीच तिच्या प्रेमात असणारे पीके तिच्या वर अजून प्रभावित होतात. पुढे घरच्यांच्या संमतीने त्यांचे महानंदीया यांच्या पद्धतीने लग्न होते. पण चार्लोट ला पुन्हा आपल्या देशात जायचे असल्यामुळे ती स्वीडनच्या जाण्यास निघते. तेव्हा पीके यांना देखील तिच्या बरोबर जायचे असून ते शक्य नसल्याचे त्यांना लक्षात येते. त्यावेळी त्यांच्या जवळ विमानाने विदेशात जाण्यासाठी तेवढे पैसे नसल्याचे ते सांगतात.
मग यावर उपाय म्हणून ते स्वतः ककडे असलेले सारे काही विकून भाड्याने घेतलेल्या सायकालीने स्वीडनला जाण्याचे ठरवतात. व येथून सुरु होतो तो भारत ते युरोप पर्यंतचा प्रेमाचा प्रवास…..! या ६/७,००० मैल असणाऱ्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या पण ते न थांबता न थकता आपल्या प्रेमासाठी पुढे जातच राहिले. तेथे पोहच्यावर चार्लोट आणि त्यांनी पुन्हा तिच्या आई वडिलांच्या परवानगीने स्वीडन मध्ये लग्न केले. आता त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. सद्यस्थितीमध्ये डॉ. पीके महानंदीय हे स्वीडन मधील एक नामांकित आर्टिस्ट आहेत. व ते आज ७२ वर्षाचे आहेत. त्यांनी आपल्या या प्रेमकथे वर एक पुस्तक सुद्धा लिहिले आहे. ज्याचे नाव आहे “The man who cycled from India to Europe for love“
तब्बल ४४ वर्षापूर्वी घडलेली हि प्रेमकथा आज ही तरुणाईला प्रेमाची खरी परिभाषा सांगते