राजकारण

उदयनराजेंनी असं करायला नको होतं

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी असं व्हायला नको होतं म्हणत “छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती होती. आताही तशी प्रवृत्ती या समाजात आहे. त्याच प्रवृत्तीला बळी पडून उदयनराजे भोसले यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला,” असं मत व्यक्त केलं.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की, “जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय असं चुकलं यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला याची कल्पना मला नाही. कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला असल्याचे” मुंडे म्हणाले.