राजकारण

अशोक चव्हाणांनी फेसबुकची प्रोफाइल पिक्चर बदलली आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकची प्रोफाइल पिक्चर बदलून शुभेच्छा दिल्या आहेत. एखाद्या राजकीय नेत्याने आपल्या पत्नीला सोशल मीडियावरअश्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्या देण्याची बहुधा पहिलीच वेळ असेल. चव्हाणांनी मिसेस चव्हाणांना अश्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

आज आमदार अमिता चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने अशोक चव्हाणांनी आपल्या अधिकृत  फेसबुक पेजवर दोघांचा फोटो शेअर करत म्हटले की, कौटुंबिक जीवनापासून समाजकारणापर्यंत प्रत्येक आघाडीवर मला मोलाची साथ देणारी, चढ-उताराच्या काळात माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी, माझ्या प्रत्येक निर्णयात सर्वतोपरी साथ देणारी आणि वेळप्रसंगी योग्य तो सल्ला देणारी माझी पत्नी सौ. अमिता हिला वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा…अशी पोस्ट केली.

कौटुंबिक जीवनापासून समाजकारणापर्यंत प्रत्येक आघाडीवर मला मोलाची साथ देणारी, चढ-उताराच्या काळात माझ्यामागे खंबीरपणे उभी…

Posted by Ashok Chavan on Sunday, October 6, 2019

अशोक चव्हाण यांची प्रेमकहाणी ;

अशोक चव्हाण राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री तर राज्याचे काँग्रेस अध्यक्ष पद भूषविले आहेत. त्यांना जन्मापासून लाल दिवा आणि सुरक्षा बाळगणारा युवराज अशी त्यांची ओळख. अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण यांनी केंद्र असो वा राज्य दोन्ही ठिकाणी अनेक महत्वाची पदे भूषवली. वडिल राजकारणात असल्याने साहजिकच अशोकरावांचे बहुतांश शिक्षण मुंबईतच झाले. अशोकरावांनी अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले.

अशोक चव्हाण यांच्यासोबत वर्गमित्र म्हणून महेश कोठारे, महेश मांजरेकर, डी पी सावंत आदी मंडळी होती. एवढ्या मातब्बर नेत्याचा मुलगा असल्याने अशोक चव्हाण यांचे एखाद्या बड्या नेत्याच्या मुलीशी लग्न होईल अशी सर्वाना खात्री होती… पण पुढे काही औरच झाले.

अशोक चव्हाण यांच्याच महाविद्यालात एक सोज्वळ आणि घरंदाज मुलगी शिकायला होती… वर्ग मैत्रीण असल्याने तिच्याशी अशोकराव यांची मैत्री होती… याच मैत्रीतून अनेकदा गप्पा टप्पा व्हायच्या… मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही.

अशोकरावांनी ही बाब त्यांच्या आईवडिलांना सांगितली… त्यांनाही ही मुलगी भावली आणि थेट 1981 साली अशोकरावांचा त्या वर्ग मैत्रिणीशी विवाह झाला… तिचेच नाव सौ. अमिता अशोक चव्हाण.

पूर्वाश्रमीची अमिता शर्मा आता अशोक चव्हाणांची अर्धांगिनी आहे…सौ अमिता या तश्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या.. पण त्यांनी चव्हाणांच्या घराची सून म्हणून पदभार स्वीकारला… बघता बघता त्यांनी सर्व रितीरिवाज समजून घेतले… सौ अमिता चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा संसार सुरळीत सुरु आहे.

सौ. अमिता यांनी त्यांचे सासू सासरे यांचा एवढे मन जिंकले की कै. शंकरराव चव्हाण मला 5 नाही तर 6 मुली आहेत असा उल्लेख आनंदाने करायचे… राजकीय वारसा असलेल्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो पण सौ अमिता यांनी आनंदाने सर्व लोकांचे आदरातिथ्य केले, करत आहेत.

सौ अमिता या नेहमीच अशोक रावांची जमेची बाजू म्हणून उभ्या राहिल्या… पतीच्या कामाचा व्याप कमी व्हावा म्हणून त्यांनी हळूहळू राजकारणातही लक्ष देण्यास सुरुवात केली.. आजघडीला त्या स्वतः आमदार आहेत… आज त्यांचे सासू सासरे हयात नाहीत पण सौ अमिता यांनी अशोकरावांच्या बहिणींना कधीच आई वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही.

लग्नाच्या 8 वर्षांनी सौ अमिता आणि श्री अशोकराव यांच्या संसारवेलीवर २ जुळ्या मुलींच्या रूपाने फुल उमलले..या जोडीचा सुखी संसार सुरु आहे