राजकारण

गरीब, बेघर लोकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजनाः अजित पवार

रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक, शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ, गरीब नागरिक यांच्यासाठी खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यात‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘कम्युनिटी किचन’ योजना लवकरच सुरु करण्यात येण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.