राजकारण

काँग्रेसने प्रचारासाठी घातली उर्मिला मातोंडकर यांना गळ? स्टार प्रचारकांची कमतरता

राज्यात काँग्रेस पूर्णपणे ढेपाळली असतानाच आता मुंबईतील वाताहत थांबवण्यासाठी याच पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने प्रचारसाठी गळ घातल्याचे बोलले जाते.

उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने लोकसभेचे तिकीट दिले होते. मातोंडकर यांनी निवडणूक लढविली पण त्यांना पराभव पत्करावा लागला. नंतर त्यांना पक्षांतर्गत कुरघोडीमुळे सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यात काँग्रेसच्या माजी मुख्यमंतत्र्यांसह अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले. पण काँग्रेसला स्टार प्रचारकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांनी उर्मिला मातोंडकर यांची भेट घेतली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टीविरुद्ध निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा चार लाख पासष्ट हजार मतांनी पराभव झाला होता. ही रंगीला मूवी फेम गर्ल प्रचारासाठी होकार देते का आता हे पाहायचंय.