राजकारण

कोरोना हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करुयातः मुख्यमंत्री

कोरोना हा छुपा शत्रू आहे, घराबाहेर पडलात तर हा शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल त्यामुळे या कोरोनाला हरवण्याचा संकल्प करा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

उध्दव ठाकरे यांनी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, ‘जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. यासाठी कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

‘कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.