राजकारण

अन् यामुळे राज ठाकरेंनी केले उध्दव ठाकरेंचे कौतुक

उध्दव ठाकरे सरकारने कोरोना बाबत घेतलेल्या खबरदारीचे त्यांनी राबविलेल्या उपाययोजनांचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, ‘मी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. ते ज्या प्रकारे काम करत आहेत. ते योग्य प्रकारे करत आहेत.’ अशा शब्दात राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

‘जी लोकं डॉक्टरांवर हात उचलत होते,  त्यांना आज जाणीव झाली असेल. लोकांना आज गांभीर्य समजत नाहीये. जनता कर्फ्यू टेस्ट केस होती, तरी लोकांनी ऐकलं नाही तर कडक पावलं उचलावी लागतील.  व्हायरस पसरला तर तो आवरण्यासाठी यंत्रणा आहेत का?  जनता कर्फ्यूनंतर टाळ्या वाजवण्यासाठी लोकं टोळक्याने बाहेर येत होते. जल्लोष करत होते. लोकांना काही गांभीर्य आहे की नाही? प्रत्येकाच्या घरावर टकटक झाली तरच आपण ऐकणार का?’ असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला.