राजकारण

भीमा कोरेगाव प्रकरण; चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी शरद पवारांना समन्स

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष होणार आहे. यासाठी  शरद पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे.

एक जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसा उसळली होती. या प्रकरणी स्थापण करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात येणार आहेत. 4 एप्रिलला ही साक्ष नोंदवली जाणार आहे.

अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता.