राजकारण

मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार कोसळले; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा

मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.  मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च  न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने बहुमत चाचणी दरम्यान हात उंचावणे, मतदान करणे आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्यासही सांगितले होते. बंडखोर आमदारांची सुरक्षा निश्चित केली जावी, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. परंतु बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.