राजकारण

युवा चेहरे कामाला लागले; आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची दमदार सुरुवात

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे युवा चेहरे कामाला लागले आहेत. आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांना सुरुवात केली आहे.

वरळीत आदीत्य ठाकरे यांनी ‘ए प्लस’ मोहिम सुरु केली आहे. कचरामुक्त वरळीसाठी एकूण नवी 70 ठिकाणं तयार होणार आहेत. वरळीच्या सर्व चौकांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाची काम सुरु झाला आहेत. त्याशिवाय वरळी सीफेसचं नूतनीकरण, रस्ते अशी अनेक कामं या मोहिमेत राबवली जाणार आहेत.

रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघात आपल्या विकास कामांना सुरुवात केली आहे. पाणीप्रश्नावर काम करण्यास रोहीत पवारांनी सुरुवात केली आहे. तसेच कुकडी प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनींचा मोबदलाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी प्रकल्पासाठी जमिनी संपादीत केल्या होत्या. मात्र 25-30 वर्ष होऊनही त्याचा मोबदला सरकार दरबारी अडकून पडला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात 62 लाभार्थींना 6 कोटी 85 लाखांचे धनादेश देण्यात आले आहेत. याशिवाय कर्जत तालुक्यांतील मंदिरांच्या विकासासाठी अभिनेता मिलिंद गुणाजींच्या माध्यमातून नवी योजनाही राबवली जाणार आहे.