राजकारण

पंतप्रधान मोदींना शरद पवारांची साथ; केले हे आवाहन

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून उद्या रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. आता त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील साथ दिली आहे.

 

शरद पवार यांनी टि्वट केले की,  “कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू अर्थात घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे ही विनंती.” त्यांनी ट्विट करुन जनतेला केली आहे.