राजकारण

भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्यात भाजपचे ‘हे’ दिग्गज नेते उपस्थित राहणार

बीड – पाटोदा तालुक्यातील भगवान बाबाच्या जन्मगावी अर्थात सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आता ते काय बोलतील यावर सर्वांचं लक्ष राहणार आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपासून संत भगवान बाबांचे जन्मगाव सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होत आहे. या ठिकाणी बाबांची मूर्ती उभारून भगवान भक्तीगड असे नामकरण करण्यात आले आहे.

आजच्या दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तत्पूर्वी याचं निमित्त साधून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी फेरी निघाली आहे. फेरीचे जागोजागी जंगी स्वागत होत आहे.