राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार देशाला संबोधित

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांशी संवाद साधणार असून त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी देशवासीयांसोबत बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यापूर्वीही पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आणि त्याला देशातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी हे जनतेला महत्त्वाच्या सूचना देणार असून काही कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा आहेत.