राजकारण

परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ नेत्याचा पंकजा मुंडेंना पाठिंबा

परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. भाजपच्या परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे या बहीण-भावात होणाऱ्या अटीतटीच्या लढतीमुळे राजकीय आखाड्यात मोठी रंगत असते. या ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टीपी मुंडे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच टीपी मुंडे यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. परळीच्या निवडणुकीत टीपी मुंडे यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मतं मिळवलेली आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधातही टीपी मुंडे यांनी निवडणूक लढवली होती.

कोण आहेत टीपी मुंडे?

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली
१९९० ला जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात भाजपच्या तिकिटावर चौसाळा मतदारसंघात अल्प मताने पराभव झाला
१९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात 51 हजार मते मिळवली
दोन वेळा परळी नगरपालिका ताब्यात घेऊन दोन वेळा ते नगराध्यक्ष झाले होते.
२००९ ला काँग्रेसच्या तिकिटावर पंकजा मुंडे यांच्याविरोधात 60 हजार मते मिळवली, तर पंकजा मुंडे यांना ९६ हजार मते होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत टीपी मुंडे यांनी काँग्रेसकडून लढताना १५ हजार मते मिळवली, तर पंकजा मुंडे ९६ हजार, धनंजय मुंडे ७१ हजार मते होती