पुणे ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा लाइफफंडा

सलाड बनवण्याच्या आवडीतून, WhatsApp च्या माध्यमातून उभा राहिला लाखोंचा बिझनेस…

आपण आपली एखादी आवड जपली आणि वाढवून त्याचे रुपांतर जर एका व्यवसायात केले तर त्यात यश हे नक्कीच येणार…कारण आवडीच्या कामातून यश तर मिळतेच पण त्यतून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.

असेच आपली आवड जाणून रिअल इस्टेट कंपनीत काम करणार्‍या पुण्यातील एका महिला उद्योजकाने काही काळातच आपली यशोगाथा लिहिली.
गेल्या १५ वर्षांपासून एका रिअल इस्टेट कंपनीत काम करणाऱ्या मेघना बाफना यांना त्यांच्या वेगवेगळ्या सॅलडच्या कौशल्याबद्दल पूर्ण खात्री होती म्हणून त्यांनी हाच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या रहिवासी असलेल्या मेघा बाफना यांनी फक्त वॉट्सअ‍ॅपवरुन सॅलडचा व्यवसाय सुरु केला होता. लहानपणापासूनच त्यांना विविध प्रकारचे सॅलड बनवण्याची आवड होती. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मेघा रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होत्या, परंतु नोकरी करत असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. म्हणून त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपला व्यवसाय सुरू केला.

त्या ऑनलाइन मेसेजिंग ग्रुप्समार्फत सॅलडची विक्री करत असत आणि आता त्यांचे हे आवडीचे काम त्यांना अर्धवेळ च काम करून दरमहा लाखोंची कमाई करुन देते.

त्यांनी चना चाट, मिक्स, कॉर्न, बीट सॅलडचीविक्री सुरू केली आणि लवकरच त्या ऑर्डर ही घालायला लागल्या.
त्यानंतर मेघाने त्यांच्या कोशिंबीरचे फोटो पुण्यातील महिलांच्या गटावर फेसबुकवर शेअर केले, त्यानंतर तिथून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. मेघा यांना शाळा आणि घरे यांमधून फोन येऊ लागले कारण आजच्या काळात लोकांना सॅलड खायला आवडते जेणेकरून ते स्वतःला फिट ठेवू शकतील. हा असा व्यवसाय आहे ज्याची मागणी कधीही संपणार नाही.
त्यांनी आता १९ लोकांना नोकरी दिली आहे – त्यातील महिलांची संख्या जास्त असून त्या भाज्या चिरणे, निवडणे ही कामे करतात. तर पुरुष या सॅलडची पँकेट घरोघरी पोहचवण्याचे काम करतात.
यांनी हा व्यवसाय २०१७ मध्ये सुरू केला होता आणि चार वर्षांत त्यांच्या होम स्टार्टअपमधून सुमारे २२ लाख रुपये कमावले आहेत.

मेघना यांना आपला व्यवसाय अजूनही वाढवायचा आहे परंतु या कोरोना साथीच्या मुळे आणि लॉकडाउनने त्यांच्या स्वप्नांना आत्ता पुरता ब्रेक लागला होता. त्यांना अजून नव्या फ्रेंचाईजी देखील उभारायच्या आहेत पण ही महामारी कमी होण्याची पर्यंत पुढचे पाऊल टाकणे कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *