इतर काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट टेक इट EASY देश पुणे बातमी ब्लॉग

पुणेकरांचा नादखुळा, दाढी करण्यासाठी बनवला चक्क ८ तोळे सोन्याचा वस्तरा…

कोरोनामुळे केस कापण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पुन्हा, ग्राहकांना सलूनमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आइडिया अवलंबल्या जात आहेत. अशाच एका पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमधील सलूनने दाढीसाठी सोन्याचे वस्तरा तयार केला आहे.

ग्राहकांसाठी सोन्याचे वस्तरा बनविणारे अविनाश बोरंडिया म्हणाले, कोरोनाने आमचा व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त केला होता. परवानगी मिळूनही, लोक फारसे येत नव्हते, त्यानंतर मी सलूनमध्ये लोकांना आणण्यासाठी ही पद्धत अवलंबली आहे. शुक्रवारी या सलूनचे पुन्हा उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडवळकर यांच्या हस्ते झाले. बोरंडिया म्हणाले की सलूनमध्ये सोन्याच्या वस्तरा वापरल्याची माहिती मिळाल्यानंतर आता ग्राहक नक्कीच वाढेल.

हा वस्तरा तयार करण्यासाठी ८ तोळा सोन्याचा वापर करून बनवण्यात आला असून त्यावर एकूण ४ लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याचे बोरंडिया यांनी सांगितले. या रेझरच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांना विशेषतः याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. कमी खर्चात सोन्याच्या रेझरने दाढी करण्याची संधी लोकांना या बोरंडियांच्या खास युक्ती मुळे मिळाली. या सोन्यापासून बनवलेल्या रेझर दाढी करण्यासाठी ग्राहकांना केवळ 100 रुपये खर्च करावे लागतील.

आजकाल व्यवसायात अशा काही नव्या युक्त्या काढून व्यवसायिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *