क्रीडा बातमी ब्लॉग महाराष्ट्र वायरल झालं जी व्हिडिओ

रस्त्यावर गुंडागर्दी करताना राहुल द्रविडचा व्हिडीओ होताय प्रचंड व्हायरल! 23 वर्षांपूर्वीही केलं होतं कांड, समोर आला व्हिडीओ…

सध्या राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पहा. कारण राहुलचं असं काही रूप यात पहायला मिळत आहे जे सध्याच्या काळात क्वचित पाहिलं असेल. एरवी सौम्य, शांत सोज्वळ दिसणारा राहुल व्हिडीओत मात्र रागानं लालबुंद झाल्याचं दिसत आहे. तसं पाहिलं तर ही एक कमर्शियल अॅड आहे. याला शुट करणाऱ्या डायरेक्टरनं सांगितलं की, राहुल द्रविडनं जेव्हा नंतर हा व्हिडीओ पाहिला तेव्हा तो हसून हसून पागल झाला होता आणि म्हणाला मी हे काय करत आहे. मी असं का करत आहे.

राहुल द्रविडचा एक जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो तोडफोड करताना दिसत आहे. तसं तर राहुलला क्रिकेटमधून अनेक निकनेम मिळाले आहेत. परंतु हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याला इंदिरानगर का गुंडा हे आणखी एक निकनेम मिळालं. खरं तर द्रविड या व्हायरल व्हिडीओ तसं सागंत आहे.

विराटनं राहुलला असं संतापलेलं कधीच पाहिलं नाही

विराट कोहलीनं ट्विट करत लिहिलं आहे की, राहुल द्रविडला एवढं संतापलेलं त्यानं कधीच पाहिलं नाही. तुम्ही देखील कधी राहुलला असं रागावलेलं पाहिलं आहे का. कदाचित नसेल पाहिलं. विराट कोहलीनं देखील ट्विट करत याची कुबली दिली आहे.

रिअल लाईफमध्ये देखील असाच रागवला होता राहुल द्रविड

राहुल द्रविड सोबत कर्नाटकसाठी क्रिकेट खेळणाऱ्या डोडा गणेश यानं मात्र राहुलचं असं रौद्र रूप पाहिलं आहे. डोडा गणेशनं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यात राहुल रागानं ओरडताना दिसत आहे. राहुल द्रविड एक रनासाठी ड्रेसिंग रूममध्ये उभं राहून ओरडताना दिसत आहे. ही 1997-98 साली खेळल्या गेलेल्या देशांतर्गत सामन्याची आहे. जेव्हा राहुल राग व्यक्त करत होता तेव्हा फील्डवर नॉन स्ट्राईकर एंडवर डोडा गणेशच उपस्थित आहे. डोडा गणेशनं शेअर केलेला व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

आता घटनेनंतर तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा एकदा राहुल द्रविड रौद्र रूपात दिसत आहे. परंतु आज राहुल जाहिरातीमध्ये तसा अभिनय करत आहे. ते काही खरंखुरं नाही. तरीही त्याला जाहिरातीमध्ये देखील अशा अवतारात पाहताना सारे हैराण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *