बातमी महाराष्ट्र राजकारण

राणें म्हणाले सीएम बीएम गेला उडत ,अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती

केंद्रीय मंत्री नारायण राणे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.राणे कोकण दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सर्व अधिकाऱ्यांना झापले.काल प्रवीण दरेकर यांना देखील शांत केले.मागील काही दिवसांपूर्वी सीएम बीएम गेला उडत असे देखील राणे म्हणाले होते.त्यांच्या या वक्तव्याला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

काही नेते मंडळी पूरग्रस्त दौरा करत आहेत.प्रत्येकाला दौरा करण्याचा अधिकार आहे.आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा दौरे केले आहेत, तहसीलदार कुठे आहेत,प्रांत कुठे आहेत,यांची विचारणा करत बसलो नाही. काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात.

हा प्रश्न आहे.मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या थराची भाषा कोणीच वापरली नसेल.यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *