तीन वर्षांपूर्वी मुलगा गौतम यांना रेमंड ग्रुपचे नियंत्रण दिले तेव्हा विजयपत सिंघानियाला वाटले की ते आपले अब्ज डॉलर्सचे कापडाचे साम्राज्य कुटुंबातच राखून ठेवत आहेत.
परंतु सिंघनिया यांनी उभ्या केलेल्या एका खास अपार्टमेंटमधली डुप्लेक्स फ्लॅट साठी मुलाने फसवणूक केल्याचा आणि कंपनीच्या कार्यालयातून त्यांना अयोग्यरित्या बाहेर काढल्याचा आरोप विजयपत सिंघानिया यांनी केला आहे.
अश्या व्यक्तीला काहीच अश्यक्य नाही ज्याने वयाच्या 67 व्या वर्षी विश्वविक्रम करण्यासाठी गरम हवेच्या फुग्यातून प्रवास केला असेल किंवा ब्रिटनहून भारतकडे जाण्याच प्रवास एकट्याने मायक्रोलाइट विमानातून केला असेल. पण आज हे ८२ वर्षांचे असणारे रेमंड,या भारतातील सर्वात मोठ्या कपड्यांच्या ब्रँडचे अध्यक्ष – चेअरमन विजयपत सिंघानिया हे सध्या कौटुंबिक वादामुळे त्रासलेले आहेत.
श्री. विजयपत यांना आता त्यांच्या तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबद्दल खेद वाटत आहे. त्यांचा दावा आहे की “भावनिक ब्लॅकमेल” केल्यामुळे आता त्यांना उच्च न्यायालयाची मदत घ्यावी लागत आहे.
२०१५ मध्ये गौतम यांच्याकडे कंपनीचे सगळे अधिकार सोपविल्यानंतर ९० वर्षीय जुन्या कंपनीचे अध्यक्ष म्हणून राजीनामा देणाऱ्या विजयपत सिंघानीया यांनी मुंबईतील टोनी ब्रीच कँडीमध्ये असलेल्या-37 मजली जेके हाऊसमधील डुप्लेक्स फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
१९४५ पासूनची रेमंड ची मालमत्ता असलेले जे.के. हाऊस २००७ मध्ये पुनर्विकासासाठी काढण्यात आले. यानंतर कुटुंबात त्रिपक्षीय करार झाला असे विजयपत सिंघानिया सांगतात, तो करार असा – विजयपत सिंघानिया, त्यांचा मुलगा गौतम, वीणादेवी (विजयपतचा भाऊ अजयपत सिंघानिया यांची विधवा), तिची मुले अनंत आणि अक्षयपत या सगळ्यांना जे.के हाऊस मधील मालमत्ता वाटली जाणार होती. वीणादेवी व तिच्या मुलांनी दोन सदनिका ताब्यात घेण्यासंदर्भात हायकोर्टात संयुक्त याचिका दाखल केली होती, तर विजयपत यांनी स्वतंत्रपणे याचिका दाखल केली असून पुनर्विकास झालेल्या फ्लॅटपैकी एक फ्लॅट देणे योग्य असल्याचे त्यांचे मत आहे. हे या वादाचे मूळ कारण आहे.
८२ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने छोट्या कापड व्यवसायाचे भारतीतील सर्वात मोठ्या कापडाच्या ब्रँड मध्ये रूपांतर केले आणि रेमंड ग्रुपने आज जगातील सर्वात उच्च दर्जाचे सूट उत्पादक असल्याचा दावा आहे. या नामवंत कंपनीतील हे वाद गेले ३ वर्ष चालू आहेत.