काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

कोरोना लसीकरणात रिलायन्स अव्वल 98 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीने घेतलेले सर्व निर्णय नेहमी चर्चेचा विषय ठरतात.रिलायन्सची अनेक क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे.त्यामुळे रिलायन्स नेहमी चर्चेत असते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व खाजगी कंपन्याना लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार रिलायन्सने एप्रिल पासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण देण्यास सुरुवात केली होती.

मिशन मिशन व्हॅक्सीन सुरक्षा या अभियानातंर्गत आतापर्यंत रिलायन्सच्या 10 लाख कर्मचाऱ्यांना कोरोना लस मिळाली आहे. 98 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाचा किमान एक डोस घेतला आहे. यामध्ये रिलायन्सच्या भागीदार असलेल्या कंपन्या देखील आहेत.

या शिवाय रिलायन्स सामान्य नागरिकांना देखील लस देणार आहे.जवळपास 10 लाख नागरिकांना रिलायन्स लस देणार आहे.नीता अंबानी यांनी मागील महिन्यांत झालेल्या वार्षिक सभेत ही बाब स्पष्ट केली होती.रिलायन्स सामान्य नागरिकांच्या लसिकरणांसाठी देखील कटिबद्ध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *