कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल, 11 जिल्ह्यांतील लेव्हल तीनचे नियम कायम

राज्यांतील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिलता देण्यात येणार आहे.11 जिल्ह्यांमध्ये तीनच लेव्हल कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत.अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.आज टास्क फोर्सची मीटिंग पार पडली.

त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्यांच्या सरासरीपेक्षा कमी आहे.तिथं सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फाइल जाईल,त्यावर ते सही करतील त्यानंतर एक दोन दिवसांत जाईल त्यावर सही केली जाईल त्या नंतर दोन दिवसांत शिथिलता देण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील.हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्ये राहणार आहे.परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद,अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली,रायगड, ठाणे, मुबई, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *