काम-धंदा ब्लॉग विदेश

वयाच्या १२व्या वर्षी व्हिडिओ गेम तयार करून विकणारा Elon Musk ठरला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती…

जगामध्ये अशी खूप लोक आहेत ज्यांनी त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवली आहेत. त्यातील काही विशेष उदाहरण अशीही असतात ज्यांची स्वप्न असामान्य असतात तरीही ते स्वप्नांचा पाठपुरावा करतात. आपण आज अशा व्यक्तीबद्दल बोलणार ज्याने स्वतःच स्वतःला घडवले आहे, ज्याने ‘खूप मोठ्ठं’ बनण्याचं स्वप्न जोपासलं आणि ते आज खरं ठरलं , ते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. त्यांचं नाव आहे ‘इलोन मस्क’.इलोन हे एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर , गुंतवणूकदार आणि रॉकेट वैज्ञानिक आहे . त्यांची एकूण संपत्ती १८५ अब्ज अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे १३ हजार पाचशे एकोणऐंशी अब्ज रुपयांपेक्षा जास्तच आहे,टेस्ला आणि स्पेसएक्स कंपन्यांमुळे इलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्ती बनले. ७जानेवारी ला टेस्लाच्या किंमती वाढल्या आणि मस्क हे श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आले.

त्यांचा जन्म साऊथ आफ्रिकेमधील प्रिटिरीया मध्ये २८ जून १९७१ ला झाला.त्यांचे वडील इंजिनिअर होते आणि मॉडेल, इलॉन ९ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि ते वडिलांसोबत राहायचे. त्यांना बालपणापासूनच पुस्तकं वाचण्याची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या ७व्या वर्षीच त्यांनी अशी अशी पुस्तकं वाचून संपवली जी कोणी कॉलेजवयीन विध्यार्थी देखील वाचू शकणार नाहीत. वयवर्षे १२ असताना त्यांनी पुस्तकांच्या मदतीने त्यांनी प्रोग्रामिंग शिकून घरच्या कॉम्पुटरट वर एक गेम बनवून टाकला , त्या गेम च नाव होत ‘ब्लास्टर’ ते एका कंपनीला ५००डॉलर ला विकून त्यांनी आपली शाळेची फीस भरली. ते स्वभावाने खूप शांत होते त्यांच्यासोबत शाळेत रिंगिंग झाली आणि त्या घटनेत त्यांना खूप मोठी दुखापत झाली होती त्याचा त्यांना आजतागायत श्वास घेण्याचा त्रास होतो.

आफ्रिकेमध्ये कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यावर कॅनडाला त्यांच्या आईकडे जाऊन त्यांनी तेथील नागरिकत्व घेतले होते. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया मधून भौतिक विज्ञान ची पदवी पूर्ण करून पीएच.डी पूर्ण केली आणि USA ला गेले .इलॉन त्यांच्या भावाच्या मदतीने Zip२ नावाची ऑनलाईन सॉफ्टवेअर कंपनी बनवली आणि तीही कंपनी विकून PayPal नावाची ऑनलाईन पेमेंट वेबसाईट बनवली आणि payment इंडस्ट्री मध्ये आर्थिक क्रांती आणले आणि तीही कंपनी जुलै २००२ मध्ये ebay.com ला विकली त्याचे इलॉन ला ९७.५ अरब रुपये आले तरी ते यात संतुष्ट नव्हते त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही कल्पना येत होत्या.

त्यांनी २००४ मध्ये टेस्ला मोटर कंपनी मध्ये त्यांनी गुंतवणूक केली आणि ते नंतर त्याचे CEO झाले. तसेच त्यांनी स्पेसएक्स नावाची कंपनी चालू केली त्यांचं स्वप्न आहे कि अंतराळात ते असं एक सॅटेलाईट पाठवणार आहेत जेणेकरून आपल्या सर्वानाच एकदम फास्ट इंटरनेट चं नेटवर्क मिळेल. हे सर्व करत असताना ते सोलर एनर्जी नावाचा अमेरिकेतला प्रोजेक्ट, Hyperloop ह्या एका पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सारख्या प्रोजेक्ट वर मस्क काम करत आहेत. अशाप्रकारे ह्या व्यक्तीचा सॉफवेअर इंजिनिअर ते रॉकेट वैज्ञानिक असा प्रवास थक्क करणारा आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *