बातमी मनोरंजन

मिस्टर इंडिया विनर मनोज पाटील यांनी केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नानंतर साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले…

विषारी गोळ्या खाऊन २९ वर्षीय मनोजने आत्महत्येसारखे पाऊल उचलले अशी घटना उघडकीस आली आहे. बुधवारच्या रात्री त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केले.सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. आता प्रश्न असा उठतो की मनोजने असे पाऊल का उचलले असावे? तर याचे उत्तर आपल्याला त्यांच्या सुसाईड नोट मधून मिळाले आहे त्यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहले आहे की साहिल नामक एक इन्फ्ल्यून्सर जो काही दिवसापासून इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्म द्वारे मला आणि माझ्या न्युट्रिशन शॉपला टार्गेट करत आहे. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला खूप त्रास झाला आहे.मी एक मिडल क्लास फॅमिलीला बिलोंग करतो आणि माझ्या झालेल्या प्रगती मुले तो खूप जळतो म्हणून तो सोशल मीडियाद्वारे तो माझ्याबद्दल खूप काही बोलला आहे.

हे सर्व काही चालू असताना तो माझ्या पत्नीला घेऊन प्लॅन देखील करत आहे. तो माझ्या आणि माझ्या पत्नीच्या अनबनीचा फायदा घेत तो मला माझे करिअर संपवण्याची धमकी दिली आहे. त्यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये लिहले आहे की मी एक खेळाडू असून माझा असा छळ होत आहे तर सामान्य माणसाचं काय?

या अगोदर देखील त्यांनी साहिल खान यांच्या विरोधात एक तक्रार नोंदणी केली होती परंतु त्या वेळी काही कारवाही झाली नाही.या आधीही साहिल खान यांच्या वरती माझ्या शिवाय २-३ तक्रार नोंदणी केल्या होत्या असे मला आदरणीय वरिष्ठ पोलिस निरीक्षक ओशिवरा पोलिस ठाणे येथे कळले.

माझ्यासोबत काही बरेवाईट झाले तर त्याचे जबाबदार सरकार, पोलिस निरीक्षक आणि साहिल खान हेच राहतील असे त्यांनी सांगितले आहे.माझी पोलिस निरीक्षक ओशिवरा यांना विनंती आहे की त्यांनी या साहिल खान वरती लवकरात लवकर कारवाई करावी.

हे सर्व पाहून तर धक्काच बसला आहे की कोठे न कोठे मराठी माणसावर टिका केली जात आहे. वयाच्या १३ वर्षी आपल्या परिवाराची जबाबदारी घेऊन कसून मेहनत करणाऱ्या या मराठी माणसाला एवढा दबाव देण्यात आला की त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *