बातमी मनोरंजन

सलमानच्या ‘राधे’चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला हा नवा विक्रम

सलमानचा बहुचर्चित ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला.ईदला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशीच एक नवा विक्रम केला आहे.हा चित्रपट भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला तर परदेशात मात्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

राधे हा भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला आहे.या चित्रपटाला 4.2 मिलियन व्ह्यूज पहिल्या दिवशीच मिळाले आहेत.सलमान खानने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.‘तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. राधे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे.

तुम्हा सर्वांचे आभार’ असे त्याने कॅप्शन दिले आहे.‘तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. राधे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. तुम्हा सर्वांचे आभार’ असे त्याने कॅप्शन दिले आहे. वीकेंडला हा चित्रपट काय जादू दाखवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या चित्रपटाला अनेक टीका देखील सहन करावी लागत आहे.या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कलाकार दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *