इतर इतिहास महिला विशेष राजकारण

जयललितांचं किचन सांभाळण्यापासून ते मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बाळगणारी ‘मन्नारगुडी माफिया’ चा रहस्यमय प्रवास

 

एआयएडिएमके पक्षाच्या माजी नेत्या तसेच तामिळनाडू च्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी व्ही. के शशिकला यांची अलीकडेच तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांना अटक झाली होती. चार वर्षांची शिक्षा पूर्ण करून त्या नुकत्याच बाहेर आल्या आहेत. बंगळुरूच्या परप्पणा अग्रहरा तुरुंगात त्या शिक्षा भोगत होत्या.

तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शशिकला यांची शिक्षा पूर्ण करुन झाली, 20 जानेवारीला त्या कोरोना पॉझिटिव आढळल्या होत्या. तेव्हा त्यांना प्रथम बंगळूर च्या बोरिंग हॉस्पिटल मध्ये व नंतर विक्टोरिया रुग्णालयात हलवलं होतं.त्यामुळे सुटकेच्या सर्व औपचारिक प्रक्रिया ह्या रुग्णालयातच पार पडल्या.

कोण आहेत या शशिकला ?

शशिकला आणि जयललिता यांची भेट 1980च्या दशकात झाली होती तेव्हा त्या पार्टीचा प्रचार सचिव होत्या. तेव्हापासून त्या दोघीं मध्ये मैत्री बरीच दशके गाजली. शशिकला चे पती तत्कालीन सरकारी जनसंपर्क अधिकारी होते तेंव्हा त्याच्या मार्फत शशिकला यांची ओळख जयललिता यांच्यासोबत झाली होती. ती ओळख पुढे जाऊन इतकी वाढली कि शशिकला या जयललिता च्या घरी जाऊन राहत असायच्या. हळू-हळू शशिकला यांनी जयललिताच्या घरची किचन मध्ये ताबा मिळवला. जयललितांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यापासून ते त्यांनी आज साडी कोणती नेसावी इथपर्यंतचे नियोजन त्यांनी स्वतःच्या हातात घेतलं होत.

त्यांच्या सहकाऱ्यांनि सांगितलेल्या माहितीनुसार शशिकला यांनी जयललिता यांची खाजगी,कौटुंबिक ते राजकीय आयुष्यावरही ताबा मिळवला होता. जयललिता कोणत्या कुटुंबियांना किंवा राजकीय नेत्यांना भेटणार हे सर्व शशिकला ठेवायच्या. हळूहळू जयललितांच्या राजकीय निर्णयात शशिकला यांचा हस्तक्षेप वाढू लागला. जयललितांच्या सहवासात त्यांनी स्वतःचंही साम्राज्य वाढवू लागल्या. हजारो कोटींची मालमत्ता जमा केली. जेंव्हा जयललिता यांची तब्येत ढासळू लागली आणि शशिकला यांच्यावर जयललिता यांना स्लो पॉइजन दिल्याचे गंभीर आरोप झाले. तेंव्हा जयललितांनी शशीकला यांची पक्षातून हकालपट्टी केली. जाहीर माफी मागितल्याने शशिकलाला याना पक्षात घेतले होते.

नेमकं काय होतं प्रकरण?

1996 मध्ये सुप्रीम सुभ्रमण्यम स्वामी यांनी जयललिता यांच्या विरोधात बेहिशोबी संपत्ती जमा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे जय ललिता यांना अटक झाली. 1997 ला चेन्नईच्या न्यायालयात जयललिता आणि शशिकला यांची केस चालू होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने 2003 मध्ये हे प्रकरण बंगलोर न्यायालयात स्थानांतरीत केले. आणि 2014 मध्ये पहिले होत्या आणि शशिकला ला दोषी ठरवण्यात आले. चार वर्षाचा तुरुंगवास व शंभर करोड रुपये दंड लावला गेला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये मोदी सरकारने नोट बंदीची घोषणा केली होती. त्याच वेळी काहीच कालावधीमध्ये शशिकला यांनी चेन्नई, पांडिचेरी आणि कोयंबटूर मध्ये बेनामी आणि खोट्या दस्तावेज द्वारे जमीन विकत घेतली होती. सीबीआयने 169 ठिकाणी छापे मारून तामिळनाडू सहित देशातील आंध्र प्रदेश दिल्ली चंदीगड हरियाणा गुजरात कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड तेलंगाना दादर नगर हवेली मध्ये कार्यवाही करण्यात आली होती.

शशिकला यांचा 2017 मध्ये 66 कोटींच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांचे नातेवाईक तिला वारसी आणि जयललितांचा मानलेला मुलगा एन सुधाकरण यांनाही शिक्षा झाली होती.

शिक्षा पूर्ण करून त्या बाहेर तर आल्या पण  हळूहळू त्या राजकीयरित्या सक्रिय होतील. पक्षाची पडद्यामाघून सूत्रे हलवताना लवकरच त्या त्यांचं उराशी बाळगलेलं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नंही पूर्ण करतील. येणाऱ्या काळात जयललिता याचा चेहरा म्हणून त्यांना मानणारा वर्ग देखील तिथे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *