देश बातमी

भारतात पहिल्यांदा होणार एका महिलेला फाशी, शबनमने कुटुंबातील ७ जनाची केली होती हत्या..

अमरोहा खून प्रकरण गेली १३ वर्ष गाजत आहे. २००८ साली घरातील सात सदस्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या शबनमला या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनवण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच मथुरा येथील देशातील एकमेव महिला फाशीच्या कक्षात शबनमला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. मथुरा जेल हे देशातील एकमेव जेल आहे ज्यात महिला फाशी देण्याची खोली आहे. हे मथुरा जेल १८७० मध्ये ब्रिटीशांच्या काळात बांधले गेले होते. शबनमने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना दया याचिका अर्ज देखील केला होता. पण तो यापूर्वीच फेटाळून लावण्यात आला असून आता मृत्यूदंड वॉरंट मिळाल्यानंतर लवकरच तिला फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. शबनम सध्या रामपूर जिल्हा कारागृहात तर तिच्या बरोबर गून्हयात सहभागी असणारा तिचा प्रियकर सलीम आग्रा तुरूंगात आहे.

शबनमला जर फाशी झालीच तर ही भारतातील पहिली महिला फाशी ठरेल. यापूर्वी अशी उदाहरणे होती जेव्हा फाशीची शिक्षा ठोठावलेल्या महिला दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात.
शबनम व सलीम यांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांनी २०१० मध्ये त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण तरीही हायकोर्टाने ही फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर शबनम आणि सलीम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील फाशीची शिक्षा कायम ठेवली.

काय आहे हे नक्की अमारोह हत्याकांड?

२००८ च्या एप्रिल मधील १४ किंवा १५ तारखेची रात्र एका कुटुंबासाठी काळरात्र ठरली. त्यांच्या घरातील शबनम नावाच्या त्यांच्याच मुलीने आपल्या कुटुंबातील सात सदस्यांची निर्घृण हत्या केली. तिने हे कृत्य तिच्या सलीम या प्रियकराच्या साथीने केल्याचे तपासात आढळून आले.
शबनम आणि सलीम यांनी अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनम च्या कुटुंबाला आधीच झोपेच्या गोळ्या दुधातून दिल्या होत्या. त्या दिवशी शबनमची आत्ये बहीण राबियाही त्याच्या घरी आली होती. रात्री शबनम आणि सलीम यांनी झोपी गेलेले वडील शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस, रशीद, मेव्हणी अंजुम, फुफेरी बहीण राबिया आणि दहा महिन्यांचा पुतण्या अर्श याला मद्यधुंद अवस्थेत झोपवून ठार मारले. हे कृत्य करून सलीम तेथून पळून गेला होता, परंतु शबनम रात्रीत घरातच राहिली. पहाटेच्या वेळी, त्याने आवाज ऐकला की, बदमाश आले आहेत. गोंगाट ऐकून गावातील लोक घटनास्थळी पोचले आणि तेथील दृश्य पाहून त्यांच्या पाय पाय खालची जमीन सरकली.

तिच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला अशी महिलेने सुरुवातीला तिने सांगितले. पण पुढे तपासात हे उघड झाले की तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांना आधी झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मग यानंतर त्यांची हत्या केली. घटनेच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी शबनम आणि सलीमला ताब्यात घेतले. यापूर्वी, त्याच्या मोबाईल कॉल डिटेलमधून सर्व माहिती मिळवण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनीही घटनेची कबुली दिली. सलीमनेही गावात असलेल्या तलावात टाकलेली हत्येत वापरलेली कुह्राड देखील जप्त केली गेली. जेव्हा दोघांनी ही भीषण कृत्य केले त्यावेळी शबनम दोन महिन्यांची गरोदर होती. नंतर शबनमने तुरूंगातच मुलाला जन्म दिला.

शबनमच्या मुलाने केली राष्ट्रपतींना विनंती

शबनमचा मुलगा ताज यांने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना भावनिक आवाहन केले आहे की त्यांनी आईला, तिच्या गुन्ह्या बद्दल क्षमा मिळावी आणि तिची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी विनंती त्याने केली आहे. सद्यस्थितीत मथुरा कारागृहात तिला मृत्युदंड देण्याच्या मृत्यूच्या वॉरंटवर केव्हाही स्वाक्षरी होऊ शकते या पार्श्वभूमीवर शबनम च्या मुलाने थेट राष्ट्रपतींना ही विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *