मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाहीतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दादा कोंडके विराजमान झाले असते…

राजकारण हे सर्व समावेश आहे अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल तरी तुम्ही जर राजकारणात यायचं ठरवलं तर राजकारण काही तुम्हा ला नको म्हणणार नाही. येथे अनेक खेळाडू, गायक, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर, याच बरोबर सिनेसृष्टी मधील कलाकार सुद्धा राजकारणाचे क्षेत्र अजमावून बघतात. यात काहींना खूप यश येते तर काहींचे असलेले करिअर सुद्धा राजकारणाने संपुष्टात येते.

राजकाणातील घडामोडी जशा आपल्याला वाचायला आवडतात तसेच राजकारण अनुभवायला ही अनेकांना आवडते. भारतात रोज ताजे काही शिजत असेल तर ते तुम्हाला राजकारणातच मिळेल हे नक्की. सारखे चर्चेत असणारे क्षेत्र म्हणजे राजकारण. त्यामुळे हे क्षेत्र सिने कलाकारांना खुणावणार नसेल तर नवलच नाही का……!?

सिने सृष्टीतील कलाकार आपलं नाव चित्रपटांमधून कमावून आजकाल राजकारणाची वाट धरताना दिसतात. कलाकारांनी राजकारणात जाण्याची संख्या तशी लक्षणीय आहे. या कलाकारांच्या अति लोकप्रियतेमुळे त्याना हे क्षेत्र जास्त खुणावत असेल कदाचित.

असाच राजकारणाशी जवळून संबंध आला होता दादांचा….. आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवून पोट दुखायला लावणाऱ्या आपल्या दादा कोंडकेंचा. हे तसे या पिढीतील खूप कमी लोकांना ठाऊक असू शकत.

दादांचा जन्म १९३२ साली मुंबई मध्ये झाला. त्यांचे बालपण नायगाव येथे गेले. मराठी कामगार वस्तीत राहणारे दादा लहानपण पासूनच आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रिय होते. त्यांना आर्थिक परिस्थिमुळे बऱ्याच ठिकाणी नौकरी करावी लागली.

पुढे कलेची आवड असणाऱ्या दादांना सेवा दलाच्या कलापथकात आपली कला सादर करण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या. त्यानंतर नाटकाची आवड असलेल्या दादांनी स्वतःचीच एक नाटक कंपनी काढली. या कंपनीने बरीच नाटके काढली पण यातलं सर्वात जास्त गाजलं ते नाटक म्हणजे ‘विच्छा माझी पुरी करा’. या नाटकाच्या यशानंतर दादांनी कधी मागे वळून पहिले नाही. या नाटका मुळेच त्यांचे पाऊल मराठी सिनेमांमध्ये पडले. या नाटकामुळे दादानां बरेच चित्रपट मिळाले आणि ते चित्रपट खूप चालले सुद्धा.

सोंगाड्या हा दादांचा सर्वात लोकप्रिय झालेला चित्रपट. तांबडी माती, बोटं लावीन तिथे गुदगुल्या, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, आंधळा मारतो डोळा असे एका पेक्षा एक चित्रपट दादांनी दिले.

याच दरम्यान चित्रपटानं बरोबरच दादांचा राजकारणाशी देखील हळूहळू संबंध येऊ लागला. एका कलाकारा सारखेच दादा कोंडके हे एक सच्चे शिवसैनिक ही होते. तो काळ म्हणजे दादांचे सुवर्णयुग होते. त्यांचा सोंगाड्या हा चित्रपट रिलीज होणार होता. पण मुंबई च्या कोहिनूर थिएटर ने सोंगाड्या न लावता त्याच जागी हिंदी सिनेमा लावला. तेव्हा मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे बाळासाहेब ठाकरे यांनी नुकताच त्यांचा पक्ष उभारला होता.

त्याला त्यांनी ‘शिवसेना’ असे नाव दिले होते. हे सर्व दादांना ऐकून ठाऊक होते. मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याचे काम बाळासाहेब करतात म्हणून दादा त्यांच्याकडे गेले. दादांची बाजू ऐकल्यावर ठाकऱ्यांनी आपले शिवसैनिक घेऊन पंजाबी असणाऱ्या कोहिनूरच्या कपूर या मालकाला चांगलाच धडा शिकवला. शेवटी ते बाळासाहेब ठाकरे होते, त्यांचे न ऐकून त्या कपूर ला थोडीच चालणार होते. त्याने एका क्षणाचा विलंब न करता सोंगाड्या रिलीज केला.

बाळासाहेबाच्या मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याच्या निश्चयाने आणि त्यांच्या ठाम व्यक्तिमत्वाने दादा कोंडक्यांना आपसूकच शिवसैनिक बनवून टाकलं. पुढे या दोघांची मैत्री इतकी घनिष्ठ झाली की बाळासाहेब दादांना सभेलाही घेऊन जायला लागले. दादा तर आता सभेत भाषणही देत असत त्यांच्या खुमासदार विनोद बुध्दीने ते सभेला आलेल्या लोकांना इतके हसवत की आता त्याच्या ही सभेला लोक बेफाम गर्दी करत. बाळासाहेब ठाकरे हे एक उत्कृष्ट कलाकार होते आणि स्वतः ते कलेचे चाहते पण होते. याचमुळे कदाचित त्यांना दादांमधील कलाकार खूप भावला. ते दादांचे चित्रपट नेहमी कौतुकाने पहात.

असे एकदा दोघे गप्पा मारताना बाळासाहेब दादांना म्हणाले, जर या निवडणूकीत शिवसेनेनी बाजी मारली तर दादा कोंडके हा महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री होणार. हे साल होते १९९५ यावर्षी महाराष्ट्रात शिवसेनेने खरच बाजी मारली होती. पण मंत्री पद वाटताना दादांना बाळासाहेबांनी विचारले, दादा तुम्हाला कोणते पद हवे तेव्हा दादांनी कोणते ही पद घेण्यास नकार दिला. व पुढे दादा म्हणाले, मी एक शिवसैनिक राहण्यातच धन्यता मानतो.

असे हे महाराष्ट्राचे लाडके दादा कोंडके यांचा राजकारणाशी अगदी जवळून आलेला संबंध तसा कमीच लोकश्रुत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *