‘श्रीनिवास पाटिल’ हे नाव राजकारण जाणऱ्यांना मुळीच नवख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून आपण पाटलांना ओळखतो. साताऱ्याच्या पोटनिवडणूकीत उद् यनराजे भोसलेंना पराजित करुन बाजी मारलेले श्रीनिवास पाटिल आपल्याला माहिती आहेत. तसेच भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेल्या जगप्रसिध्द सभेला श्रीनिवास पाटिल होतेच. या दोन महानूभवांची मैत्री तर अख्खा महाराष्ट्र जाणून आहे. श्रीनिवास पाटिल हे नाव राजकारणाला ही नव नाही. जवळ जवळ दोनवेळा कराड मतदार संघाचे खासदार झालेले पाटिल सिक्किम राज्याचे राज्यपाल (२०१३-१८) देखील होते.
सिक्कम या राज्याचा राज्यपाल एक महाराष्ट्रीय माणूस झालेला सगळ्यांनाच आवडलं होत. त्यावेळी सिक्कम मध्ये मराठी लोक पर्यटनासाठी जाऊ लागले. याचा फायदा सिक्किमच्या पर्यटन व्यवसायाला झाला. पाटलांच्या ५ वर्षाच्या कारर्किदीत महाराष्ट्र – सिक्कम संबंध ही जवळचे झाले.
महाराष्ट्राच्याकराड या गावी जन्मलेल्या श्रीनिवास पाटलांचा आज जन्मदिवस. कराड सारख्या ठिकाणाहून पाटिल पुण्याला शिकायला आले. त्यांनी पुण्याच्या सुप्रसिध्द स.प. महाविद्यालयात शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी पुण्यातच एल.एल.बी च शिक्षण पूर्ण केलं.
राजकारणी असूनही अगदी निराळा, मनमेळावू, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा हूशार माणूस म्हणून श्रीनिवास पाटिल सगळ्या राजकारण्यांमध्ये प्रसिध्द आहेत. आपल्या अभ्यासू पणामुळे, वाचनाच्या सवयीमुळे त्यांचे भाषण ही अगदी सुसह्य वाटते. विनोदशैलीचा योग्य रित्या वापर करून लोकांशी बोलण्यात खुमारी आणण्यात पाटिल सरावलेले आहेत. त्यांची एक व्यक्ति म्हणून असलेली दिलखुलास वृत्ती, एक राजकारणी म्हणून असलेला नेतृत्वगुण, एक मित्र म्हणून असणारी एकनिष्ठता
हे सगळं त्याना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात मिळालेल्या बाळकडूच फळ आहे हे ते स्वतःही अमान्य करु शकणार नाहीत.
स.प. महाविद्यालयात असताना श्रीनिवास पाटिल ‘एनसीसी’ मध्ये होते. पुढे त्यांनी महाविद्यालयात घेतली जाणारी सी.आर म्हणजे कॉलेज प्रतिनिधीची निवडणूकही लढवली.
मित्रांमध्ये प्रसिध्द असणाऱ्या पाटलांना सुरवाती पासूनच मैत्री जपण्याची सवय हे आपण सगळेच जाणून आहोत. शरद पवार आणि श्रीनिवास पाटलांच्या मैत्रीचे किस्से तर महाराष्ट्रभर प्रसिध्द आहेतच.
लोकांचा नेता असणारे पाटिल जसे मैत्री साठी प्रसिध्द आहेत तसेच ते लोककल्याणासाठी ही नावजलेले आहेत. रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभावच…
ते कोणाला मदत करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहात नाहीत. त्यांनी बऱ्याच विद्यार्थांना योग्य शिक्षण घेण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर हा गोरगरिबांसाठी, जनतेसाठी झाला पाहिजे. या तत्वावर ते आजही ८०व्या वर्षी ठाम आहेत आणि जन कल्याण कस होईल या साठी कार्यशील आहेत.
अशा या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाला बिंग मराठी कडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!