क्रीडा

अजिंक्य रहाणेने शेअर केला आपल्या नन्ही परीचा पहिला फोटो

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या घरी एका गोंडस नन्ही परीचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी राधिकाने 5 ऑक्टोबरला मुलीला जन्म दिला होता. अजिंक्यला ही आनंदाची बातमी भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने ट्विटरवरून पहिल्यांदा दिली होती. त्यावेळी अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका विरोधात पहिला कसोटी सामना खेळत होता. दरम्यान हा सामना भारतानं 203 धावांनी जिंकला. त्यानंतर रहाणे सर्वातआधी मुंबईच्या आपल्या घरी पोहचला आणि बाळाला भेट दिली. त्यानंतर अजिंक्यने सोशल मीडियावर पत्नी राधिका आणि मुलीबरोबरचा पहिला फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो पोस्ट करताना त्याने ‘हॅलो’ असे कॅप्शन टाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तोच फोटो अजिंक्यची पत्नी राधिकानेही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *