क्रीडा

डोळ्यासमोर चेंडू पण.. पाकिस्तानच्या खेळाडूचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक आक्रमक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा डेव्हिड वॉर्नर पाकिस्तान विरोधात कसोटी मालिका खेळत आहे. या सामन्यात वॉर्नरने मारलेला एक जोरदार शॉट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय सलामीच्या फलंदाजांना योग्य ठरवला. सलामीचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबशॅन यांनी पाक गोलंदाजांची शाळा घेतली.

सामन्यातील ४२वी ओव्हर सुरु होती. पाकिस्तानचा इफ्तेकार अहमद वॉर्नरसमोर गोलंदाजी करत होता. दरम्यान ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर वॉर्नरने एक जोरदार शॉट मारला. वॉर्नरने मारलेला हा शॉट इतका जोरदार होता की सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला त्याच्या दिशेने येणारा बॉल दिसलाच नाही. परिणामी वॉर्नरला चौकार मिळाला. या शॉटमुळे पाकिस्तानी क्षेत्ररक्षणाची मात्र, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. यावर मीम्सही तयार केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *